आश्विनी..!
जिचं माहेर आणि सासर हे एकाच ठिकाणी जोडून ठेवणारी... घराला घरपण देणारी... नात्याने लहान असूनही मोठमोठाल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेळणारी
.. समोर संकटं उभी ठाकलेली असूनही चेहऱ्यावर सदा नितळ हसू बाळगणारी... बोलघेवडी... निर्मळ मनाची... मायाळू... दयाळू... जिच्या वावरण्यानं-अस्तित्वानं घरातील चैतन्य जागृत करणारी... लाभलेल्या अल्पायुष्यामध्ये आम्हा प्रत्येकात प्रेमाचे, आपुलकीचे, मायेचे, ऋणानुबंधाचे सडे शिंपडीत नंदनवन फुलवणारी... स्वतःच्या त्यागाची आहुती देत जी काही जडणघडण निर्माण केली... अशी ही आमची सून... आश्विनी..! हिचा पुण्यानुमोदन-शोकसभा करण्याची वेळ आमच्यावर यावी यापेक्षा आणखी दुर्दैव ते काय?
ज्या आक्राळ-विक्राळ आजारांना तिला गिळंकृत केलं त्या आजाराचा सामना तिने जीवनाच्या अखेरपर्यंत केला खरा; पण शेवटी शोकांतिका ठरली. आमच्या विनोदला ह्या असल्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ ही काही नवी नाही. मोठा भाऊ व आमचा मोठा भाचा दिवंगत प्रमोदलाही वाचवण्यासाठी आणि आज त्याच्या पत्नीलाही वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आमच्या विनोदला - त्याच्या अविरत प्रयत्नांना यश आलं नाही.
आज या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने हेच सांगणे आहे की, आजपर्यंत तू अनेक संकटे झेललीस... त्यात तुला नोकरीही गमावी लागली... स्वतःकडे दुर्लक्ष करून तू अश्विनीसाठी झटलास... मात्र आता तुला या सर्वांच्या परे जाऊन तुझ्या गोंडस मुलीसाठी-विनंतीसाठी पुन्हा नव्याने आणि जोमाने आयुष्याला सुरुवात कर. तुझ्या पंखात बळ येवो आणि पुन्हा नव्याने उत्तुंग अशी भरारी घे..!
आज आम्हा प्रत्येकाच्या मनात जीचे कधीही विस्मरण होऊ शकत नाही अशा या आमच्या सुनेला-अश्विनीला निर्माण प्राप्त होवो!!!
मी चंद्रकांत पवार चाफेरी माझे कुटुंबीयंतर्फे, भारतीय बौद्ध महासभा गावशाखा चाफेर आणि जनकल्याण कमिटी यांच्यावतीने आमच्या या सुनेला आदरांजली व श्रद्धांजली अर्पण करतो. नमोबुद्धाय - जय भीम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा