सोमवार, १६ जुलै, २०१८

सर्व पौर्णिमांचे धम्मातील महत्व



          तथागत भगवान बुध्दांच्या काळात म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी आज सारखी विद्युत दिव्यांची सुविधा उपलब्ध नव्हती. निसर्गनियमाप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्णाकृती असतो त्यामुळे पृथ्वी चंद्राच्या प्रकाशाने उजळते. म्हणून प्रत्येक पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात तथागत भगवान बुध्द उपदेश, धम्मदीक्षा आणि धम्मज्ञान उपासकांना देत असत.


          बौध्द संस्कृतीची नाळ चंद्रावर आधारित दिनदर्शिकेशी जुळलेली आहे. चैत्र १९३७ असे नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. तरी समस्त बौध्द उपसकांनी प्रत्येक पोर्णिमेचे महत्व समजून घेवून बौध्द परंपरेप्रमाणे साजरी करून संस्कृती जतन करावी.

          सर्व पौर्णिमांचे महत्व खालीलप्रमाणे आहे.

चैत्र पौर्णिमा (चित्त)                   :       सुजाताचे भगवान बुध्दास खीरदान.

वैशाख पौणिर्मा (वेसाक्को)   :   तथागत बुध्दांचा जन्म, ३५ व्या वर्षी ज्ञानप्राप्ती ८० व्या वर्षी महापरिनिर्वाण.

ज्येष्ठ पौर्णिमा (जेठ्ठ)                 :   तपुस्स भल्लुकाची धम्मदीक्षा, संघमित्रा महेंद्र यांनी श्रीलंका येथे बोधिवृक्ष लावला.

आषाढ पौर्णिमा (आसाळहो)    :   राणी महामायाची गर्भधारणा, राजपूत्र सिध्दार्थाचे महाभिनिष्कमण, सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन म्हणजेच गुरू पौर्णिमा, वर्षावासाची सुरूवात.

श्रावण पौर्णिमा (सावणो)          :   अंगुलीमालाची दीक्षातथागत बुध्दांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली धम्म संगितीची सुरूवात.

भाद्रपद (पोठ्ठपादो)                 :   वर्षावासाचा कालावधी

अश्विन (अस्सयुजो)           :   पौणिमेस वर्षावास समाप्ती, या महिन्याच्या दहाव्या दिवशी सम्राट अशोकाची भिक्खू मोग्लीपुत्त तिस्स यांच्याकडून धम्मदीक्षा अर्थात अशोक विजयादशमी, बाबासाहेब आंबेडकर लाख लोकांची नागपुरला धम्मदीक्षा.

कार्तिक पौर्णिमा (कार्तिको)    :   आधुनिक मृलगंधकुटी विहार, सारनाथ्ला अनागरीक धम्मपाल यांनी तक्षशिला (पाकिस्तान) येथे प्राप्त झालेल्या भगवंताच्या पवित्र अस्थी भारतात आणून सुरक्षित ठेवल्या. या अस्थींच्या दर्शनार्थ जगभरातील उपासक पौर्णिमेस भेट देतात.

मार्गशिर्ष (मागसीरो)             :   पौर्णिमेस सिध्दार्थ गौतम यांची बुध्दत्व करण्यापूर्वीची राजा बिंबीसार सोबत पहिली भेट.

पौष पौणिर्मा (पुस्सो)               :   राजा बिंबीसारांची धम्मदीक्षा.

माघ पौर्णिमा (माघो)             :   तथागत बुध्दांची महापरिनिर्वाणाची घोषणा, स्थविर आनंद यांचे परिनिर्वाण.

फाल्गुल पौर्णिमा (फग्गुनो)     :   बुध्दत्व प्राप्ती नंतर कपिलवस्तूस पहिली भेट, पुत्र राहुलची धम्मदीक्षा.


भवतु सब्ब मंगलम्‌

सादु!
सादु!!

सादु!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...