गुरुवार, ११ मे, २०२३

निर्मला देवींच्या जाहीरातीवरील समिक्षा

 निर्मला देवींच्या जाहीरातीवरील समिक्षा

(नातेवाईकांनी व्हाट्सअप वर पाठवलेल्या हॅन्डविला त्यांना दिलेले उत्तर)



     सहजयोग गुरु परमपूज्य माताजी निर्मला देवी यांच्या अध्यात्माबद्दल आदर आहेच. त्यांच्या आयुष्यात शांततेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे भान ठेवून तुम्ही पाठवलेल्या पॅम्प्लेटमध्ये काही त्रुटी, उणीवा आढळून आल्या त्याबद्दलचे काही मुद्दे मांडू इच्छितो. 

बौद्ध धम्माच ब्रीद असलेल्या 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' यातील 'सुखाया' असं चुकीचं लिहीलं गेल्याचं दिसून येते. 

दुसरं म्हणजे बाबासाहेबांचं लिहिलेलं चुकीचं नाव- बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर असे नसून एकतर डॉ. बी. आर. आंबेडकर तरी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी लिहावयास हवे होते. 

पॅम्प्लेट मधील लिखाण हे गुगलवरच्या विकिपीडिया मधून मिळवल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे ते वृक्ष वाटते. 

बाबासाहेबांना कधीही विभूती मान्य नसून ते आधुनिक विचारसरणीचे असल्यामुळे पुराणातील व्यास, वाल्मिकी, राम इत्यादींचे अस्तीत्व नाकारले. त्यांनी हिंदू देवतांची उपासना करणार नाही अशी 22 प्रतिज्ञांमध्ये 1956 च्या बौध्द धम्माच्या दीक्षा समारंभात शपथ घेतली व आपल्या साऱ्या अनुयायांनाही दिली. त्याचबरोबर सर्व बहुजन समाज वंचित पीडित असलेल्या स्त्रिया (यामध्ये ‍ख्रीश्चन-अल्पसंख्यांक असलेल्या निर्मला मातेचाही समावेश आहे) यांना सन्मान देऊन संविधान रूपाने जणू त्यांना ढालच सुपूर्द केली. मात्र आजच्या उच्च पदावर गेलेल्या स्त्रिया यांना बाबासाहेबांच्या बहुमोल कार्याची जाणीव नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. 

पॅम्प्लेट वरील मातेचा स्वतःचा सुरूवातीला भव्य दिव्य फोटो, स्वत:ची जाहीरात आणि त्याखाली महामानव महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबांचे छोटे फोटो आणी त्यांच्याबद्दलची २/४ वाक्यांची जुजबी माहीती यामधला भेद हा अनपेक्षीत आहे. 

पॅम्प्लेटमध्ये माताजींचे वडील पि के राव साळवे हे अत्यंत "उच्च दर्जाचे" स्वातंत्र्यसैनिक होते असे म्हटले आहे. खरे तर स्वातंत्र्यसैनिक यांना "उचनीचतेचा दर्जा" देऊन आपण त्यांच्या हौताम्याचं, त्यांच्या योगदानाचं अवमूल्यन केल्यासारखे आहे. स्वातंत्र्यसैनिक हा शेवटच्या रांगेतला असो वा प्रथम क्रमांकाचा; प्रत्येकाच्या नसानसात देश प्रेम, त्याग ठासून भरलेला असतो. त्यामुळे स्वातंत्र्यसैनीकाला कोणताही दर्जा देणे हे सगळ्यात घातक आहे.

बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे. ज्याला धर्म आणि धम्म या मधला फरक कळत नाही तो अशी गफलत करू शकतो हे मी सांगावयाची गरज नाही. 

माताजींचे पिताश्री पी के राव साळवे समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक असतीलही. कायद्याचे शिक्षण ही घेतले असेल, 14 भाषा ही त्यांना अवगत असतीलही. माताजींच्या बायोग्राफीत म्हटल्याप्रमाणे "Her father, a talented lawyer and close associate of Mahatma Gandhi, was a member of the Constituent Assembly of India and helped write India's first constitution." मात्र पॅम्लेटमधील विधानानुसार संविधान सभेच्या सदस्यांच्या यादीत पी के राव साळवे असे नाव कुठेही नमूद नाही ‍ कींबहुना बाबासाहेबांना संवीधान लिहावयास मदत केली. ही सर्व विधाने अतिशय हास्यास्पद आहेत. आपल्या माहीतीसाठी संविधान सभेच्या सदस्यांची यादी पुढीलप्रमाणे देत आहे. भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर संविधान समितीच्या एकूण २८४ सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत.

ओ.वी.मुदलियार अलगेसन, अम्मु स्वामीनाथन, एम ए अयंगार, मोटूरि सत्यनारायण, दक्षयनी वेलायुधन, दुर्गाबाई देशमुख, एन. गोपालस्वामी अयंगर, डी. गोविंदा दास, जेरोम डिसूजा, पी. कक्कन, टी एम कलियन्नन गाउंडर, लालकृष्ण कामराज, वी. सी. केशव राव, टी. टी. कृष्णमाचारी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एल कृष्णास्वामी भारती, पी. कुन्हिरामन, मोसलिकान्ति तिरुमाला राव, वी. मैं मुनिस्वामी पिल्लै, राजा एम अन्नामलाई मुत्तैया चेट्टियार, वी. नादिमुत्तु पिल्लै, एस नागप्पा, पी. एल नरसिम्हा राजू, पट्टाभि सीतारमैया, सी. पेरुमलस्वामी रेड्डी, टंगुटूरी प्रकाशम, एस एच. गप्पी, श्वेताचलपति रामकृष्ण रंगा रोवा, आर लालकृष्ण शन्मुखम चेट्टि, टी. ए रामलिंगम चेट्टियार, रामनाथ गोयनका, ओ पी. रामास्वामी रेड्डियार, एन जी रंगा, नीलम संजीव रेड्डी, शेख गालिब साहिब, लालकृष्ण संथानम, बी शिव राव, कल्लूर सुब्बा राव, यू श्रीनिवास मल्लय्या, पी. सुब्बारायन, चिदम्बरम् सुब्रह्मण्यम्, वी सुब्रमण्यम, एम. सी. वीरवाहु, पी. एम. वेलायुधपाणि, ए क मेनन, टी. जे एम विल्सन, मोहम्मद इस्माइल साहिब, के. टी. एम. अहमद इब्राहिम, महबूब अली बेग साहिब बहादुर, बी पोकर साहिब बहादुर, वी. रमैया, रामकृष्ण रंगा राव, बालचंद्र महेश्वर गुप्ते, हंसा मेहता, हरिविनायक पटस्कर, बाबा साहब डॉ.भीमराव अम्बेडकर, यूसुफ एल्बन डिसूजा, कन्हैयालाल नानाभाई देसाई, केशवराव जेधे, खंडूभाई कसनजी देसाई, बाळासाहेब गंगाधर खेर, मीनू मसानी, कन्हैयालाल माणिकलाल मुंशी, नरहर विष्णु गाडगील, एस निजलिंगप्पा, एस. के. पाटिल, रामचंद्र मनोहर नलावडे़, आर आर दिवाकर, शंकरराव देव, गणेश वासुदेव मावलंकर, विनायकराव बालशंकर वैद्य, बी एन मुनवली, गोकुलभाई भट्ट, जीवराज नारायण मेहता, गोपालदास अंबैदास देसाई, प्राणलाल ठाकुरलाल मुंशी, बी एच. खरडेकर, रत्नाप्पा कुंभार, वल्लभ भाई पटेल, अब्दुल कादर मोहम्मद शेख, आफताब अहमद खान विनायक राणे , पंजाबराव देशमुख, सं.दि.परब, मनमोहन दास, अरुण चन्द्र गुहा, लक्ष्मी कांता मैत्रा, मिहिर लाल चट्टोपाध्याय, काफ़ी चन्द्र सामंत, सुरेश चंद्र मजूमदार, उपेंद्रनाथ बर्मन, प्रभुदयाल हिमतसिंगका, बसंत कुमार दास, रेणुका राय, हरेन्द्र कुमार मुखर्जी, सुरेंद्र मोहन घोष, श्यामाप्रसाद मुखर्जी, अरी बहादुर गुरुंग, आर ई. पटेल, क्षितिज चंद्र नियोगी, रघीब अहसान, सोमनाथ लाहिड़ी, जासिमुद्दीन अहमद, नज़ीरुद्दीन अहमद, अब्दुल हलीम गज़नवी, डॉ भीमराव अम्बेडकर, अजीत प्रसाद जैन, अलगू राय शास्त्री, बालकृष्ण शर्मा, बंशीधर मिश्र, भगवान दीन, दामोदर स्वरूप सेठ, दयाल दास भगत, धरम प्रकाश, ए धरम दास, रघुनाथ विनायक धुलेकर, फिरोज गांधी, गोपाल नारायण, कृष्ण चंद्र शर्मा, गोविंद बल्लभ पंत, गोविंद मालवीय, हरियाणा गोविंद पंत, हरिहर नाथ शास्त्री, हृदय नाथ कुन्ज़रू, जसपत राय कपूर, जगन्नाथ बख्श सिंह, जवाहरलाल नेहरू, विजय लक्ष्मी पंडित, जोगेन्द्र सिंह, जुगल किशोर, ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, बी वी. केसकर, कमला चौधरी, कमलापति त्रिपाठी , आचार्य कृपलानी, महावीर त्यागी, खुरशेद लाल, मसुरियादीन, मोहनलाल सक्सेना, पदमपत सिंघानिया, फूल सिंह, परागी लाल, पूर्णिमा बनर्जी, पुरुषोत्तम दास टंडन, हीरा वल्लभ त्रिपाठी, राम चंद्र गुप्ता, शिब्बन लाल सक्सेना, सतीश चंद्रा, जॉन मथाई, सुचेता कृपलानी, सुंदर लाल, वेंकटेश नारायण तिवारी, मोहनलाल गौतम, विश्वम्भर दयालु त्रिपाठी, विष्णु शरण दुबलिश, बेगम ऐज़ाज़ रसूल, चौधरी हैदर हुसैन, हसरत मोहानी, अबुल कलाम आजाद, नवाब मुहम्मद इस्माईल खान, रफी अहमद किदवई, मौलाना हिफ्ज़ुर्हमान स्योहारवी, बशीर हुसैन जैदी, रणबीर सिंह हुड्डा, बख्शी टेक चन्द, पंडित श्रीराम शर्मा, जयरामदास दौलताराम, ठाकुरदास भार्गव, बिक्रमलाल सोंधी, यशवंत राय, लाला अचिंत राम, नंद लाल, सरदार बलदेव सिंह, गुरमुख सिंह मुसाफिर, सरदार हुकम सिंह, सरदार भूपिंदर सिंह मान, सरदार रतन सिंह लौहगढ़, सरदार रणजीत सिंह, अमिय कुमार घोष, अनुग्रह नारायण सिन्हा, बनारसी प्रसाद झुनझुनवाला, भागवत प्रसाद, Boniface लाकड़ा, ब्रजेश्वर प्रसाद, चंडिका राम, लालकृष्ण टी. शाह, देवेंद्र नाथ सामंत, डुबकी नारायण सिन्हा, गुप्तनाथ सिंह, यदुबंश सहाय, जगत नारायण लाल, जगजीवन राम, जयपाल सिंह मुंडा, कामेश्वर सिंह, कमलेश्वरी प्रसाद यादव, महेश प्रसाद सिन्हा, कृष्ण वल्लभ सहाय, रघुनंदन प्रसाद, राजेन्द्र प्रसाद, रामेश्वर प्रसाद सिन्हा, राम नारायण सिंह, सच्चिदानन्द सिन्हा, सारंगधर सिन्हा, सत्येन्द्र नारायण सिन्हा, बिनोदानंद झा, पी. लालकृष्ण सेन, श्रीकृष्ण सिंह, श्री नारायण महता, श्यामनन्दन सहाय, हुसैन इमाम, सैयद जाफर इमाम, एस.एम.लतीफुर्रहमान, एम. ताहिर, तजमुल हुसैन, चौधरी आबिद हुसैन, हरगोविन्द मिश्र, गुरु अगमदास, रघु वीर, बड़ेभाई ठाकुर ललोनी, राजकुमारी अमृत कौर, नगला भौगरा (कामा) , भगवंतराव मंडलोई, बृजलाल बियाणी, बैरिस्टर ठाकुर छेदीलाल, प. किशोरी मोहन त्रिपाठी, सेठ गोविंद दास, डाँ.सर हरिसिंह गौर, हरि विष्णु कामथ, हेमचन्द्र जगोबाजी खांडेकर, घनश्याम सिंह गुप्ता, लक्ष्मण श्रवण भाटकर, पंजाबराव शामराव देशमुख, रविशंकर शुक्ल, आर लालकृष्ण सिधवा, शंकर त्र्यंबक धर्माधिकारी, फ्रैंक एंथोनी, काजी सैयद करीमुद्दीन, गणपतराव दानी, आर.एल. मालवीय, रामप्रसाद पोटाई, निबारन चंद्र लास्कर, जेम्स जॉय मोहन निकोल्स रॉय, धरणीधर बसु मतरी, गोपीनाथ बोरदोलोई, कुलाधौर चालिहा, रोहिणी कुमार चौधरी, मुहम्मद सादुल्ला, अब्दुल रऊफ, विश्वनाथ दास, कृष्ण चन्द्र गजपति नारायण देव, हरेकृष्ण महताब, लक्ष्मीनारायण साहू, लोकनाथ मिश्र, नंदकिशोर दास, राजकृष्ण बोस, शांतनु कुमार दास, लाल मोहन पति, एन माधव राव, राज कुंवर, शारंगधर दास, युधिष्ठिर मिश्र, देशबंधु गुप्ता, मुकुट बिहारी लाल भार्गव, सी. एम. पूनाचा, के.सी.रेड्डी, के.हनुमन्तैया, टी. सिद्धलिंगैया, आर गुरुव रेड्डी, एस वी कृष्णमूर्ति राव, एच. सिद्धवीरप्पा, टी. चेन्निया, शेख मुहम्मद अब्दुल्ला, मोतीराम बैगरा, मिर्जा मोहम्मद अफजल बेग, मौलाना मुहम्मद सईद मसूदी, पट्टम ताणु पिल्लै, आर शंकर, पी. टी. चाको, पानमपिली गोविन्द मेनन, एनी मस्करीन, पी. एस. नटराज पिल्लई, के ए मोहम्मद, विनायक सीताराम सरवटे, बृजराज नारायण, गोपीकृष्ण विजयवर्गीय, राम सहाय, कुसुम कांत जैन, राधवल्लभ विजयवर्गीय, सीताराम एस जापू, बलवंतराय मेहता, जयसुख लाल हाथी, ठक्कर बापा, चिमनलाल चकूभाई शाह, सामलदास गांधी, जयपुर से वी. टी. कृष्णमाचारी और हीरालाल शास्त्री, खेतड़ी से सरदार सिंह, बीकानेर से के एम पण्णिकर‌ और जसवंत सिंह, भरतपुर से राज बहादुर, उदयपुर से माणिक्य लाल वर्मा और बलवंत सिंह मेहता, शाहपुरा से गोकुल लाल असावा, अलवर से रामचंद्र उपाध्याय, कोटा से दलेल सिंह, जोधपुर से जय नारायण व्यास और सी एस वेंकटाचारी सर टी वी राघवाचर्या(उदयपुर), अवधेश प्रताप सिंह, शम्भूनाथ शुक्ल, राम सहाय तिवारी, मन्नूलालजी द्विवेदी, भैयालाल सिंह, हिम्मत सिंह लालकृष्ण माहेश्वरी, गिरिजा शंकर गुहा, रवि मैहरा, लाल सिंह, भवनजी अर्जुन खिमजी, यशवंत सिंह परमार.

पॅम्प्लेटमध्ये माताजींचे वडील गांधीवादी होते असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे बाबासाहेबांशी मैत्री असणे ही गोष्टच अनाकलनीय आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांचे माताजींच्या घरी येणे-जाणे (?) किंवा माताजींना लाभलेला बाबासाहेबांचा सहवास(?) या गोष्टी म्हणजे फेकाफेकीचा कळसच झाला. कारण बाबासाहेबांच्या आत्मचरित्रामध्ये माताजी किंवा त्यांचे वडील पि के राव साळवे यांचा कुठेही उल्लेख नाही. भले, गांधींनी माताजींना नेपाळी म्हणायचे ते म्हणो. माताजींचे वडील गांधीवादी होते. त्यामुळे गांधींचा सहवास लाभणे यात काही शंकाच नाही. किंवा असाही तर्क निघतो की, गांधींची हत्या 30 जानेवारी 1948 झाली त्याच्या आदल्या दिवशी गांधी माताजींना लाडाने नेपाळी म्हणाले. मग गांधींच्या हत्येनंतर माताजी व त्यांचे वडील हे गांधीवादी न रहाता आंबेडकरवादी झाले की काय?

एखाद्या महापुरुषाचं नाव अख्ख्या जगभर प्रसिद्ध झालेलं असतं. मग या समाजात काही लोकांची विकृती अशी असते की या महामानवाच्या नात्याशी आपला संबंध जोडावयाचा आणि आपली खाली असलेली प्रतिष्ठा थोडी आपणच स्वतःहून उंचवावयाची; हा एक बालिश प्रयत्न असतो.  त्याचप्रमाणे माताजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या नावाला त्यांचा सहवास लाभल्याचं भासवून आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केला आहे. 

बाबासाहेब माताजींच्या घरी जात असत असाही केविलवाणा प्रयत्न वाचून वाईट वाटतं. थोडक्यात, बाबासाहेबांच्या शालूला स्वतःचं लुगडं लावून पुढे करण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद नाहीतर आणि काय? 

बौद्ध धर्म आणि सहजयोग या मुद्द्यांमध्ये कुंडलिनी जागृत होण्याचा मुद्दा मांडला आहे. मात्र तथागतांनी म्हणजेच गौतम बुद्धांनी अशा कुंडलिनी चक्राचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यांनी ध्यानही केलं नाही. त्यांनी तपश्चार्याही केली नाही. त्यांनी तपही केले नाही. त्यांनी फक्त आणि फक्त एकाग्रतेने चिंतन केले. आपण गफलत हीच करतो. ध्यान, तपश्चर्या आणि चिंतन, मनाची एकाग्रता हे सगळं एकाच मोळीत बांधायचा प्रयत्न करतो पण तो खरा नव्हे. 

स्वतःला जागृत करा. "अत्त दीप भव" असं बुद्धाने म्हटलंय. प्रेम, करुणा, दया वाटा. जग आपोआप सुंदर होईल. या अनेक बुद्धांच्या शिकवण्या इतर लोक आपापल्या प्रवचनामध्ये कॉपी करून ते स्वतःच्या नावावर खपवतात हा अनेक वर्षांचा इतिहास आहे.

माताजींचं एक वाक्य मात्र पटलं. ज्यांच्या अंत:करणात करुणा नाही त्यांनी समाजकार्य करू नये ज्यांनी समाजकार्य केले नाही त्यांनी राजकारणात जाऊ नये.

बौद्ध धम्मात फक्त बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि, संगम शरणम गच्छामि याचा अर्थ सांगितला की धम्म संपत नाही. बौद्ध धम्म हा विशाल समुद्रासारखा आहे. केवळ या त्रिसूत्रींचा अर्थ सांगून धम्म समजून घेता येत नाही. 

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचाही इतिहास या पॅम्प्लेटमध्ये केवळ दोन-चार ओळींमध्ये मांडून त्यांच्या कार्याचा आढावा इतका शॉर्टकट कधीच पाहिलेला नसावा. हे पॅम्प्लेट काहीसं जाहिरातबाजीचं असल्याचं जाणवतं.

मी हे ही जाणतो की, हे पॅम्लेट काही खुद्द माताजींनी लिहीलेलं नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा महिमा गौरवीण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. पण त्यातही एकसूत्रता नाही. असो...

-  जितेंद्र पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...