शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१८

वंशवेल-थोर महामानवांची

              जागतिक कीर्तीचा स्कॉलर विद्यार्थी म्हणून विदेशी युनिव्हर्सिटीच्या प्रथम क्रमांकाच्या यादीत ज्याचं नाव कोरलेलं आहे ते युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मापासूनच दुःख अगदी कोळून प्यायलेत आणि या दुःखावर तुच्चुन उभे राहून एक नव्हे दोन नवे तब्बल बावीस पदव्या  घेतल्या. ही प्रखर बुद्धिमत्ता आणि भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे योगदान यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' (SYMBOL OF KNOWLEDGE) म्हणून ओळखले जाते. अजूनही या ३ जी ४ जी च्या जमान्यात प्रत्येक घरात एक तरी डिग्री घेतलेला मुलगा किंवा मुलगी मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. ते नेहमी म्हणत की, मनुष्याने जन्मभर शिकावयाचे ठरविले तरी तो ज्ञानमहासागराच्या गुढगाभर पाण्यापर्यंतच पोहोचू शकतो. यावरून जगातील ज्ञानाचा आणि त्या ज्ञानाप्रति बाबासाहेबांची असलेली आत्मीयता किती आहे हे यावरून दिसून येते.  


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशवेल  

   

         याच  'सिम्बॉल ऑफ नॉलेज' ने ज्यांना आपले गुरु मानले त्या पैकी एक म्हणजे तथागत गौतम बुद्ध होय. या करुणेच्या महासागराची महत्वाकांक्षा, त्याग, वैराग्याची कसोटी आणि साऱ्या विश्वावर मिळविलेला परमोच्च विजयामुळेच आज हजारो वर्ष झाली तरी या पराक्रमी तथागताच नाव आजही अखंड विश्वात गाजतंय नवे ते यापुढेही उत्तरोत्तर मोठं होत जाणार आहे यात शंका नाही. तथागत गौतमाची ही वंशवेल माझ्या स्वहस्ताक्षरात. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...