गुरुवार, ५ मे, २०२२

होय, मला भिम पावला...

अमानुषतेचा फास सोडविण्या

पूर्वजांचा माझ्या जो धावला...

होय, मला भिम पावला... 

होय, मला भिम पावला...


हजारो वर्षे विद्येपासून वंचित असलेला मी... 

स्वाभिमान-आत्मसन्मानाचा लवलेश नसलेला मी... 

दोन पाय दोन हात आणि हा देह आजवर जनावरात जगलेला मी...

सनातन्यांची अंध:कारमय गुलामी करीत आलेला मी... 

आणि नव्या उमेदीचं, स्वाभिमानाचं जग असतं याची जाणीव नसलेला मी... 

पिचलेल्या, दबलेल्या, भेदरलेल्या अन् दिडमुग झालेल्या आवाजातला मी...

अखेर फोडला एकदाच असा टाहो की, 

आक्रोशाने जातीबाटीचा हा देश आणि सहिष्णूवाद्यांची उडविली तारांबळ

घेऊन लेखणी अन अंधार ज्वलंत शब्दांची 

केला एल्गार सत्याग्रहाचा उडविली झोप काळ्या रामाची पण खितपत पडलेल्या घोर अन्यायाची...


नागवंशीयाचा जन्म माझा 

घेऊन दीक्षा धम्माची 

शिकलो सवरलो मिळवूनि त्या शिष्यवृत्त्या 

भोजन केले सौख्याचे भटाबामणाच्या मांडीला बसून...


जमीन-अस्मानाचा हा कायापालट 

नाही एका रात्रीत जाहला... 

होय मला भीम पावला...

               

अमानुषतेचा फास सोडविण्या

पूर्वजांचा माझ्या जो धावला...

होय, मला पावला... 

होय, मला भीम पावला...

                           -  जितू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...