करुणेचा महामेरू तथागत
गौतम बुध्द, संत कबीर, महात्मा जोतिबा फुले आणि या तीन महामानवांना ज्यांनी आपले गुरू
मानले ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन!

कोणी एका शाहिराने म्हटलंय-
‘संविधान’ हा शब्द आजपर्यंत केवळ पाठ्यपुस्तकात आणि आंबेडकरांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंना भारताची घटना बहाल करताना त्या घटनेच्या पुस्तकावरच पहायला मिळायचा. पण आज मा. प्रंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सहकार्याने २६ नोव्हेंबरला सर्व भारतात शासकीय कार्यालयातून साजरा करण्यात येतो ही एक कौतुकाची बाब म्हणायला हवी. कारण डॉ. आंबेडकरांनी केवळ दलितांनाच नव्हे तर भारतातील सर्वच्या सर्व जातींचे कल्याणच करून ठेवलंय. पण याकडे मात्र दलितेतर समाज सोयिस्कररित्या डोळेझाक करून आंबेडकर हे केवळ त्यांच्याच लोकांचं भलं केल्याची बोंब आजही उठवली जाते आणि त्यावर बहुतांश लोकांचा विश्वासही बसतो. याचं कारण काय बरं असू शकतं? कारण हे की, आपलं या संविधानाबद्दल-भारताच्या घटनेबद्दलचे अज्ञान होय. ब्रिटिशांना हाकलवून भारतात प्रजासत्ताक लोकशाही या संविधानाच्याद्वारे अवलंबिली. तिथपासून आजपर्यंत सुमारे ६७ वर्षे हे संविधान संविधान म्हणजे नक्की काय हे सामान्य लोकांना कसं कळणार? कारण आजपर्यंत कोणत्याही सरकारने जाहीरपणे असा संविधानाचा गौरव केलेला नाही आणि त्याचमुळे हे भारताचे संविधान कोणाला कधीही कळले नाही. येथील विघ्नसंतोषी लोक मात्र अंधारात तीर मारून संविधानास दोष लावून मोकळे होतात. भारताची राज्यघटना म्हणजे विद्वानांची गोष्ट, सरकार चालविणाऱ्यांची मक्तेदारी अशी सामान्य माणसाची धारणा होती, केवळ निवडणूका किंवा सरकारचं आगमन-निर्गमन म्हणजे लोकशाही असंच आपण समजायला लागलो. आजवर आपल्याकडे संविधान कोणी कोणाला दाखवंत नसल्याने प्रत्यक्षात संविधान निरक्षरतेमुळे आपले प्रश्न वाढतात किंवा ते सुटत नाही, हे समजून घ्यायला वेळ लागतोय. माझं असं म्हणणं आहे की , जोपर्यंत हे संविधान तळागातील लोकांपर्यंत पोहचत नाही, त्यातील मार्गदर्शक तत्वे आणि कलामांचे आकलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या देशात लेखकांना खरी, अभिप्रेत असलेली लोकशाही नांदणार नाही. याच संविधानाचा अमेरिकेसारख्या प्रगतशील देशांनी गौरव केला पण म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही या उक्तीप्रमाणे त्याच मोल आपणास कळत नाही. भारताची राज्यघटना मंजूर झाली त्या दिवशी घटनापरिषदेत केलेल्या संस्मरणीय भाषणातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विभूतीपूजेच्या प्रवृत्तीपासून आणि सत्तेवरील नकारात्मक नैराश्य प्रवृत्तीपासून भारतीय लोकशाहीला धोका असल्याचा इशारा दिला होता. आणखी एक कारण मला अधोरेखित करावेसे वाटते ते म्हणजे जे या देशातील कायदेपंडित आहेत, जे संविधानाचे अभ्यासक आहेत त्यांनी शासनाच्या आदेशानुसार खरंतर अद्वितीय असलेले हे संविधान कसे लोकहितकारी आहे याची जागृती सर्व भारतीयांना व्हावी ही मोहीम हाती घेतली पाहिजे.
कोणी एका शाहिराने म्हटलंय-
"येशू
के बायबल पर ख्रिश्चन चलता है,
वेदो और पुरणोंपर ब्राम्हण चलता है,
अल्लाह के
कुराण पर मुसलमान चलता है,
लेकिन मेरे भीम के संविधान पर पुरा हिंदूस्थान चलता है"

पुणे
जिल्ह्यातील भोर तालुक्यातील लव्हेरी नावाच्या गावामध्येही अशाचप्रकारचा एक
नाविन्य असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये स्वच्छता गाव, तंटामुक्ती गांव, साक्षर गाव, हरित गाव अशी शासनाची अभियानं सुरू झाली आणि काही
प्रमाणात ती यशस्वी झाली, पण या गावामध्ये डॉ. रोहिदास जाधव यांनी ‘संविधान
साक्षर’ या नावाचं अभियान राबवलं आणि तेथे यशस्वी ही झालंय. लव्हेरी गावच्या
घराघरामध्ये भारतीय संविधान पोहाचले आहे. इतकेच नव्हे तर तेथील प्रत्येक व्यक्तीने
संविधान नक्की काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. सक्तीच शिक्षण, महिला मुक्ती, शुध्द पाणी, आरोग्यसुविधा
आपल्याला सरकार देतं; पण सरकारला हे करायला कोण भाग पाडतं? तर डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी लिहिलेले संविधानच! अशाप्रकारचे अध्ययन त्या गावामध्ये झाल्याने
तेथील लोकांना संविधानाचे अनोखे रूप समोर आल्याने स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाने
प्रेरित झाल्याने ती सर्वधर्मसमभाव असल्याचं समजून आलं; ही पण एक क्रांती म्हणावी
नाही तर आणखी काय?
त्याचप्रमाणे
या २०१७ सालामध्ये माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी तालुक्यामध्ये अशी एक क्रांती
घडली आणि ती म्हणजे मौजे सत्कोंडी या गावी मा. बैकरसर आणि
त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नाने या वर्षी डॉ. बाबासाहेबांची १२६ वी जयंती
त्यांच्या गावामध्ये साजरी करून त्यामध्ये पंचक्रोशीतील बहुजन समाजाला एका
निळ्या झेंडयाखाली आणले ही गोष्ट खरंच अतिशय कौतुकास्पदच आणि अभिनंदनीय आहे. महापुरुषांच्या केवळ जयंत्या साजऱ्या केल्या म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं नाही. त्या महापुरुषांच्या विचार आपल्यात उतरायला हवेत. त्यांनी केलेल्या अमूल्य त्यागांचं ऋण, त्याची किंमत कळली की मग त्या महापुरुषाप्रति अभिमान वाटतो आणि मग स्वयंप्रेरणेने स्फुरून अशी क्रांती जन्म घेते हे एक ताज उदाहरण होय. बंधुनो इतर समाजाला आता कळायला लागलाय डॉ. आंबेडकर, पण तो ज्या समाजातून वर आलाय तो आपला समाज अजूनही त्याला अप्रत्यक्षपणे खाली खेचतोय. हां.. तुमच्या मनात प्रश्न उठणे स्वाभाविक आहे. डॉ. आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा दिलेला मूलमंत्र. पण आपण शिकलो तेही अर्धवट, बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर जे विखुरले गेलो ते आजतागायत संघटित झालो नाही आणि संघर्ष तर आपण भावा-भावामध्ये, बाप-लेकामध्ये आपापसात जमिनीच्या वाटणीवरून, घराच्या जागेवरून, बापाने कामविलेल्या संपत्तीवरून करू लागलो. बाबासाहेबाना संघर्ष हवा होता तो आपल्या समाजवार केलेल्या आजवरच्या अन्यायाबाबत, जातीविषमतेबाबत. लोक आपल्याला समाजाची शंभर शकले झाली म्हणून हिणवतातही पण आपल्याला त्याचं काहीच नाही. बरं त्यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचेही आपण किती गांभीर्याने पालन करतो. म्हणून म्हणतो बाबासाहेबाना इतरांपेक्षा आपणच पूर्णतः समजू शकलो नाही हे दुर्दैवानं म्हणावसं वाटतं.
प्रसिध्द लेखक य. दि. फडके यांच्या 'आंबेडकरी चळवळ' या
पुस्तकात बाबासाहेबांचा एक वाढदिवसाचा प्रसंग सांगितला आहे. 'डॉ. बाबासाहेब
आंबेडकराची समाज परिवर्तनाची घौडदौड अशीच वेगाने सुरू झाली होती. १९२७ साली अवघे ३५ वर्षांचे असतानाच त्यांच्या वाढदिवस त्यांच्या निष्ठावंत अनुयायांनी
सार्वजनिकरित्या साजरा करण्यास सुरूवात केली. पण माणसाला देव मानणे किंवा अवतारी
पुरूष म्हणून त्याची पूजा करणे हे बाबासाहेबांना मुळीच आवडत नसे. वाढदिवसानिमित्त
दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या जाहीर सार्वजनिक सभांना १५ वर्षांत एकदाही हजर न
राहिलेले बाबासाहेब सन १९४२ च्या त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त भरलेल्या
सत्कार सभेत हजर राहिले आणि त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले, “तुम्ही माझा
वाढदिवस गेली पंधरा वर्षे साजरा करीत आहात. माझा नेहमीच या प्रकाराला विरोध असल्याने
मी आजवर या समारंभाला कधीच हजर राहिलो नाही. तुम्ही आता माझा सुवर्णमहोत्सव साजरा
केला आहे. इतके पुरे झाले. यापुढे माझ्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका,” अशा
शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुचना दिल्या. नेत्याविषयी अपार भक्ती बाळगली की,
जनतेचा आत्मविश्वास नाहिसा होतो, जेव्हा जेव्हा भारतात धर्माला ग्लानी येते तेव्हा
तेव्हा आपण अवतार घेतो या श्रीकृष्णाच्या हवाल्यावर विसंबून राहिल्याने हिंदू समाज
संकटाच्या वेळी कसा अगतिक बनतो याची त्यांनी लोकांना आठवण करून दिली. "एखाद्या कसोटीच्या प्रसंगी असा नेता नसेल किंवा कशाचाच विधीनिषेध न बाळगणाऱ्या
पुढाऱ्यांच्या तावडीत जनता सापडली तर तीला निराधार असल्यासारखे वाटू लागते.
मुक्तीसाठी तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीवर अवलंबून राहू नका. तुमची मुक्ती तुमच्या हाती आहे आणि ती तुम्हीच प्रयत्न करून मिळविली पाहिजे.” डॉ. बाबासाहेब पुढे असेही
म्हणतात, “मी मूर्तिपूजक नाही उलट मूर्तिभंजनावर माझा विश्वास आहे,” असे रानडे,
गांधी आणि जीना यांच्यासंबंधी १८ जानेवारी १९४३ रोजी दिलेल्या व्याख्यानाच्या
पुस्तिकेच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी म्हटले होते.'
अस्सल
नाणं वाजल्याशिवाय राहत नाही. ‘सत्यमेव जयते’ या उक्तिप्रमाणे आजपर्यंत डॉ.
बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे प्रथम गुरू तथागत गौतम बुध्द यांचे कार्य, त्याग,
बहुजनांसाठीची असलेली तळमळ ही लपविण्यात आली होती; पण आज उशीरा का होईना या दोन
महामानवांचं कार्य पुढे येवू लागलं आहे-त्यांचं महत्व साऱ्या जगाला आता पटू
लागलंय.
दोन
दिवसांपूर्वीच्या वर्तमानपत्रात ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी येत्या
शंभर वर्षात मानवाला पृथ्वी सोडून अन्य ग्रहावर जावे लागेल असं भाकित केलंय. विचार
करा १०० वर्षांत किती भयानक परिस्थिती असू शकते आपली. आपल्या पुढच्या पिढीची
जेमतेम यापुढे केवळ दोन पिढ्याच जगू शकतात या पृथ्वीवर, याला कारण आपणच आहोत. आपण
आपल्या चैनीसाठी, उपभोगासाठी वाट्टेल तसं मनमुराद वागू लागलो. ज्या पृथ्वीवर राहतो
तीची काळजी घेतली पाहिजे हा विचारच भूईसपाट झालाय. याबाबत एका वर्तमानपत्रात
पनवेलच्या पत्रलेखिका अर्पिता पाठक यांनी आपल्या पत्रात या मुद्द्यावर
‘आध्यात्माची कास धरा’ असे आवाहन केले आहे. मनुष्याचे सर्वांगीण कल्याण करणाऱ्या आध्यात्माची
कास पकडण्याविना जगाला पर्याय नाही असं त्या पत्रात लिहितात. याचाच अर्थ
बुध्दाच्या धम्माला त्याच्या विपश्यनेला पर्याय नाहीय यापुढे बंधुनो.
डॉ.
आंबेडकरांचा एक अतिशय सुंदर असा सुविचार आहे, “Cultuvation of mind should be
ultimate aim of human existence.” मनाची मशागत ही मानवी अस्तित्वाचे अंतीम ध्येय
असावे. म्हणजे बुध्दीचा विकास मानवी अस्तित्वाचे अंतीम लक्ष असायला पाहिजे आणि
बुध्दीचा विकास हा दोन पर्यायांनी आत्मसात करता येतो-एक म्हणजे पुस्तकांचे वाचन
करून जो बाबासाहेबांनी मार्ग निवडला आणि दुसरा म्हणजे विपश्यनेने Meditation ने
मेडिटेशनमध्ये खरी खुरी रिॲलिटी असते. आपलं मन म्हणजे एक जादू आहे जादू. एक किस्सा
आठवला. तो ऐकल्यावर आपल्यालाही खात्री पटेल की काय ताकद असते ती मनाच्या
सामर्थ्याची..!
एका गावाच्या वेशीबाहेर एक ५/६ वर्षांचा आणि दुसरा ११/१२ वर्षांचा मुलगा जंगलामध्ये फिरायला गेले. जंगलात फिरता फिरता त्यांना एक विहीर दिसली. त्या विहीरीजवळ गेल्यावर अचानक एक अपघात झाला. त्या दोन मुलांपैकी जो मोठा मुलगा ११/१२ वर्षाचा होता तो त्या विहीरीत पाण्यामध्ये पडला. आता दोघेही खूप घाबरलेले, किंचाळत होते. वाचवा-वाचवा म्हणून ओरडून धावा करीत होते. पण गावापासून दूर असलेल्या त्या जंगलात कोणी नसल्यामुळे या दोघांना काही सुचेनासं झालं. विहीरीच्या वर असलेल्या लहान मुलाने वेळ न दवडता त्या विहीरीला असलेल्या पाणी काढायच्या दोरीला पाण्यामध्ये लगेच फेकले आणि त्याच्या मित्रास पकडायला सांगितले. पाण्यामध्ये पडलेला मित्रही लगेचच त्या दोरीला बिलगला व वरती येण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर वर असलेल्या त्या लहान मित्राने त्याचे सर्व प्रयत्न पणाला लावून त्या दोरीने त्याला वर काढले. त्यांनी एकमेकांना गच्च मिठी मारली आणि त्यांच्या डोळयातून आनंदाश्रू वाहू लागले. पण बंधुंनो गोष्ट खरी पुढे सुरू झाली. या अपघातातून ते दोघे मित्र आपल्या गावी परतले. झाला प्रकार त्या दोघांनी लोकांना सांगितला. पण त्या दोघांना धीर द्यायच्या ऐवजी लोकांनी मुर्खात काढले आणि कधी शक्य आहे का? हे खोटं बोलतायत म्हणून मग त्या गावामध्ये एक वयस्कर गृहस्थ जे बुजूर्ग समजले जायचे त्यांच्याकडे हे लोक गेले आणि झाला प्रकार सांगून ही गोष्ट शक्य आहे काय? असे त्या गृहस्थाला विचारले तर ते बुजूर्ग त्वरीत म्हणाले , 'का नाही हा छोटा मुलगा एक त्याहून मोठ्या मुलाला विहीरीतून बाहेर काढू शकत? काढू शकतो. नक्की काढू शकतो.' तरीही लोकांना पटेना म्हणून त्यांनी आणखी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्या बुजूर्ग माणसाने सांगितलेले शब्द किती मार्मिक आणि प्रभावी आहेत याचे प्रत्यंतर येते. ते असं म्हणाले, ‘ज्यावेळी मोठा मुलगा विहीरीत पडल्यावर छोट्या मुलाने आपले सारी शक्ती पणाला लावून प्रयत्न केला आणि त्याने आपल्या मित्राला सहिसलामत विहिरीच्या बाहेर काढले याचे कारण असे की, त्यावेळी त्या ठिकाणी त्या लहान मित्राला ‘तुला हे जमणार नाही,’ असं सांगणारा तिथे अन्य कोणीही नव्हता…' पाहिलंत एक लहान मुलगा आपल्यापेक्षा एका मोठ्या मुलाला विहिरीतून दोरीच्या सहाय्याने सहिसलामत बाहेर काढू शकतो. दॅट इज द पॉवर ऑफ माईंङ याच पॉवर ऑफ माईंडने आपण अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवू शकतो. मग ती युपीएससी-एमपीएससीची परिक्षा असो, स्पोटर्स, आर्ट, ट्रेकिंग सारखे धाडशी साहसे असोत वा अन्य काहीही. कोणत्याही गोष्टीची आवड लागली ती हाती लागेपर्यंत तीचा ध्यास सोडता कामा नये यासाठी केवळ आपल्या मनात एक ठिणगी पडणे आवश्यक आहे आणि ती ठिणगी म्हणजे प्रबळ इच्छेची.

माझं
असं म्हणणं आहे की, या आपल्या निसर्गत:च मिळालेल्या मनाच्या सामर्थ्याच्या (mind power) जोडीला
जरका spirituality अध्यात्माची जोड मिळाली तर या जगात असाध्य ते साध्य होवू शकतं.
सध्या समाजात चाललेल्या अत्याचारांवर, व्याभिचारांवर, आपापसातील संघर्षांवर, चोरी,
खून बलात्कार या अतिशय वाईट घटना थांबू शकतात. या रानटीपणाचे रूपांतर सज्जनामध्ये
घडू शकतं असं मी खात्रीलायक सांगू शकतो. जसं म्हणतात ना वाल्याचा वाल्मिकी झाला,
त्याचप्रमाणे तथागतांच्या जीवनातील जो प्रत्येक वाटसरूची हत्या करून त्याचे एक बोट तो आपल्या गळ्यातील माळेत बांधून ठेवी तो अंगुलीमालासारखा क्रुर डाकू त्यांना लीन झाला.
किती शक्ती असते या आपल्या मनाच्या सामर्थ्यात. आपण ज्यांना चमत्कार म्हणतो ते
बुध्दाकडेही दाखविण्यासारखे नव्हते असे नाही. पण त्यांनी कधी त्याचे प्रदर्शन केलं नाही.
त्यांनी त्याही पुढे जावून मानव दु:खाने गांजलेला आहे आणि त्या दु:खाचं मुळ शोधून
काढल्याशिवाय ते शांत झाले नाहीत. ही संबोधी म्हणजे ज्ञानप्राप्ती मिळवण्यासाठी
आपणा साऱ्यांनाच माहिती आहे त्यांनी आपले आईवडील, पत्नी, मुलगा इतकंच नव्हे तर तो
एका विजयी राजाचा राजपुत्र असूनही संपूर्ण राज्याचा त्याग करून वैराग्य धारण करून
त्यानंतर आत्मक्लेश करून पाहिला. त्यांच्या मनात असलेल्या साशंकता तपासण्यात काही वर्षे घेतली. सर्व मनुष्य, प्राणी अन्य जीवसृष्टीस अनुकूल ठरेल अशा मध्यम मार्गाचा धम्माची ज्ञानप्राप्ती
केवळ ४ आठवड्यांमध्ये झाली. त्यात त्यांना या जगात दोन समस्या आहेत हे उमजलं. एक
म्हणजे दु:ख आणि दुसरं म्हणजे दू:ख दूर करून मानवाला सुखी कसं करावे हे होय.
तथागतांची त्यानंतरची घोडदौड आपणास ठावूकच आहे. हा हा म्हणता जगभर त्यांचे नाव
पसरलं. जनसमुदायांचे लोटच्या लोट भिक्खूसंघात सामिल झाले.
बुध्दाने आपल्या धम्मशासनात आपणा स्वत:साठी
असे विशेष स्थान निर्मिलेले नाही किंवा आजच्या भोंदूसाधूंप्रमाणे आपला त्यांनी उत्तराधिकारीही नेमला नाही. त्यांच्यामते, ‘धम्म हा स्वत:च्या अंगच्या सामर्थ्यानेच
जगला पाहिजे; त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे.’ त्याचबरोबर ते असं
म्हणतात की, मी मार्गदात आहे, मोक्षदाता नव्हे, मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या
श्रमाने मिळवावा. केवढा तो नम्रपणा, किती विनय, किती ती करूणा आणि किती तो शांतीमय
प्रफुल्ल असा चेहरा. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच आपल्याही अंतरंगात एक विशिष्ट
प्रकारची फ्रिक्वेन्सी तयार झाल्यावाचून राहत नाही. ज्याला ज्याला बुध्द म्हणजे
काय हे जाणून घ्याचं असेल त्याने त्याने मेडिटेशनची पहिली पायरी तरी चढून पहावी.
नाहीतर हे सर्व सांगणं म्हणजे सात आंधळे आणि हत्ती यांच्या गोष्टीसारखं होईल. जसं
सात आंधळे असतात. त्यांना एका हत्तीसमोर उभे केलं जातं त्यातीत पहिला आंधळा
हत्तीच्या पायाला हात लावून असा निष्कर्ष काढतो की, हा एक मोठा खांब आहे.
त्यानंतर दुसरा आंधळा त्याच्या सोंडेला हात लावून म्हणतो की, हा एक वेडावाकडा रस्ता आहे. तिसरा आंधळा हत्तीच्या शेपटीला स्पर्श करून ही एक दोरी आहे
असे अनुमान काढतो. असे करत करत ६ आंधळे त्या हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करून वेगवेगळे अनुमान
काढून त्या बिचाऱ्या हत्तीला वेगवेगळया वस्तुंची उपमा देवून टाकतात पण कोणालाच
हत्ती हा प्राणी आहे हे ओळखता येत नाही. परंतू डोळस माणूस असे
म्हणेल की, हत्तीच्या बाबतीत ही सर्व वर्णने अंशत:च खरी असून त्याचे प्रत्यक्ष
स्वरूप यापेक्षा वेगळे आहे. म्हणून म्हणतो एखादी गोष्ट ‘जाणण्याने’ विश्वास येतो
आणि ‘मानण्याने’ अंधविश्वास येतो. अग्नी ही एक ऊर्जा आहे. तीला स्पर्श केला तर
शरीराला इजा होते. तसेच बर्फ ही थंड वस्तू आहे या गोष्टी आपण जाणतोच-मानत नाही.
कारण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय आणि प्रत्यक्ष अनुभव घेणे यालाच जाणणे म्हणतात
आणि अप्रत्यक्ष अनुभवणे उदा. माझ्या खापरपणजोबांनी पणजोबांना सांगितले, पणजोबांनी आजोबांना सांगितले आजोबानी वडिलांना सांगितले आणि वडिलांनी मला सांगितले म्हणून मी कोणत्याही तर्कबुद्धीने खरी वस्तुस्थिती न पाहता नुसतं मानू लागलो तर आणि लोकांनी सांगितले म्हणून मी विश्वास ठेवला याला
म्हणतात अंधविश्वास. तथागतांना काही लोक हे विष्णूचा अवतार मानतात. त्याच्या विरोधात आंबेडकरांनीही आपल्या २२ प्रतिज्ञांमध्ये त्याचे खंडन केले आहे. क्रमांक ५
मध्ये त्यांनी असं म्हटलंय, “बुध्द हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा व खोडसाळ प्रचार
आहे असे मी मानतो.” मुळात बुद्धानेही आत्मा आणि पुनर्जन्माचे खंडन केले आहे आहे. मनुष्याचे त्याच्या जन्मापासून ते मारेपर्यंतच त्याचे अस्तित्व आहे असा वैज्ञानिक दृष्टीकोन त्याने जगासमोर मांडूनही त्याला विष्णूच्या रांगेत बसविले जाते हे अज्ञान नाही तर काय?
स्वामी विवेकानंदांचा एक सुविचार लक्षात
घेण्यासारखा आहे. ते म्हणतात, “एका वेळी असे शंभर बुध्द निर्माण व्हायला हवेत ही काळाची गरज
आहे.” कारण याच बुध्दाने-तथागताने
दृष्टीआडची सृष्टी पाहिली आणि आपल्यालाही दाखवली. तर ही दृष्टीआडची सृष्टी कधी
पहायला मिळते तर डोळे मिटून काही काळ शांत बसल्याने-ध्यान साधनेने-मेडिटेशनने.
Meditaion is a part of spirituality and the spirituality meance right action
with the right time. किंवा Reality हा as it is observe करणं म्हणजे spirituality.
पण इथेही एक संभ्रम आहे तो स्पष्ट केलाच
पाहिजे. शाळा शिकून मोठा झाला याला आपण सुशिक्षित म्हणतो. पण सुशिक्षताची परिभाषा
कशी ठरवावी. डॉ. बाबासाहेब म्हणतात की, शिक्षण हा एक विशाल महासागर आहे आणि तो आपण
आजन्म शिकावयाचे ठरविले तरी त्याच्या केवळ गुडगाभर पाण्याच्या खोलीइतके ज्ञान
प्राप्त करू शकतो. इतके हे ज्ञान विशाल आहे. त्यामुळे गंमत अशी होते की चार दोन
पुस्तके वाचून काही इयत्ता शिकलेला माणूस स्वत:ला सुशिक्षीत म्हणजे ‘बुध्दीमान’
म्हणवतो. तर अजिबातच न शिकलेल्यास लोक अशिक्षित ‘बुध्दू’ समजतात आणि या अशिक्षित आणि
सुशिक्षितांच्याही कितीतरी वर गेलेला तो ‘बुध्द’ होय. म्हणजे सर्वात खालचा बुध्दू,
त्याच्यावरचा बुध्दीमान आणि सर्वात उच्च स्थानावर असलेला तो बुध्द होय. पण या तीन
स्तरांमधील सर्वात खालचा म्हणजे बुध्दू आणि सर्वात वरचा म्हणजे बुध्द हे दोन्ही लोक
कुणाच्याही वादविवादात सामिल होत नाहीत. सर्वात खालचा बुध्दू याला तर त्या विषयाचे
काहीच ज्ञान नसते आणि सर्वात वरचा म्हणजे बुध्द (ज्याला खरोखर संबोधि प्राप्त
झाली) याला त्या विषयाचे पुरेपूर ज्ञान असतेच शिवाय त्याच्या व्यतिरिक्त अन्यही
सर्वांगीण ज्ञान आणि त्याचा परिणाम काय साधला जाणार आहे याची तर्कबुध्दीच्या जोरावर
तो सारे अवगत असतो आणि त्यामुळे हा बुध्द कुठल्याही वादात पडण्याचे टाळतो. आता
राहता राहिला तो मधला बुध्दीमान समाजाला जाणारा वर्ग. याला तर काही कामच नाही म्हणा ना. कोणताही
विषय त्याला द्या हा आपला सुरूच झाला पाहिजे जेणेकरून समोरच्यालाही वाटावे की किती
हा विद्वान बरे. पण या स्वत:ला बुध्दीमान म्हणविणाऱ्या आणि आपलेच म्हणणे दुसऱ्यावर
लादणाऱ्या अशा वर्गापासून आपण सावध राहिले पाहिजे.
नाईलाजाची
विश्रांती म्हणजे झोप आणि ईलाजाची विश्रांती म्हणजे ध्यान-मेडिटेशन. याच
मेडिटेशनच्या जोरावर आपण दृष्टीआडची सृष्टी पाहू शकतो. अन्यत: आपण सर्व एका
अंधाऱ्या खोलीत धडपडतोय असं म्हणवं लागेल. याच मेडिटेशनमुळे सत्य काय आणि असत्य
काय याचं अन्वेषण (analysis) तंतोतंतपणे करता येतं. नाही तर लोकांनी प्रेम या
भावनेला किती विचित्रपणे रंवून ठेवलंय… एक प्रेम आहे ज्यातून आपण काहीतरी
मिळविण्याचा प्रयत्न कातो आणि एक प्रेम आहे ज्यात आपण पूर्णपणे डूबून जातो. तिथे
कोणताही स्वार्थ्, संकुचतपणा, कुहेतू नसतो. निर्मळ प्रेम, प्रेम आणि प्रेम प्रज्ञावान प्रेम असतं.पहिलं प्रेम हे मुला-मुलींचं प्रेम, आई-मुलांचं प्रेम, वडील-मुलाचं
प्रेम, भाऊ-बहिणीचं प्रेम आणि अन्य नात्यातील प्रेम हे प्रेम आणि मी वर सांगितलेलं प्रेम यात जमीन-समानाचं अंतर आहे. पहिल्या प्रमात केवळ
मिळावट आहे, स्वार्थ आहे तर दुसऱ्या प्रेमात नेहमीच त्याग आणि त्यागच असतो. बरं
देशभक्ती म्हणजे प्रेम आहे का? तसे असेल तर दोन राष्ट्रा-राष्ट्रांमधील देशभक्तांनी केलेली
एकमेकांची हत्या ही एक प्रेमळ कृती समजावी लागेल. म्हणून खरे प्रेम हे आंधळे नसते.
प्रमाची स्वत:ची अशी प्रज्ञा असते. तेथे अहंकाराला जागा नसते. ते निरागस असतं.
एका चित्रकाराला परमेश्वराचं चित्र काढायची
इच्छा होते. त्याचा मित्र त्याला एका ५/६ वर्षांच्या मुलाचं चित्र काढ ते थेट
कृष्णासारखे होईल असा सल्ला देतो. चित्रकार या कामात यशस्वी होतो. खूप सूंदर
झालेल्या कलाकृतीमुळे हा चित्रकार बक्कळ पैसाही कमावतो. त्यानंतर २० वर्षांनी
पुन्हा त्याला राक्षसाचं चित्र काढण्याची कल्पना सुचते. पुन्हा मित्र त्याला सल्ला देतो
की, तुरूंगात जाऊन ज्यानं अनेक खून, दंगली, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे केलेल्या कैद्याला समोर बसवून तो राक्षसाचं चित्र काढतो. हिंस्त्र दिसणारा, लाबुंद डोळे,
केस-दाढी वाढलेला, क्रूर चेहऱ्याचा कैदी विस्मयानं जेव्हा चित्रकाराला विचारतो, तेव्हा त्याला
समजते की, चित्रकार एका राक्षसाचं चित्र काढतोय. क्षणात तो कैदी स्तब्ध होऊन
त्याच्या डोळयातून अश्रू वाहू लागतात. म्हणून चित्रकार त्याला विचारतो की, तू रडतो
का आहेस? त्यावर तो कैदी म्हणतो, चित्रकार महाशय, तुम्ही मला ओळखलं नाहीत. वीस वर्षांपूर्वी त्या गोड
मुलाला समोर ठेवून कृष्णाचं चित्र काढलं होतं, तो मीच आहे. या वीस
वर्षांच्या माझ्यातला देव हळूहळू क्षीण, दुबळा होवून मरत गेला आणि राक्षस हळूहळू
बलवान होत गेला… असंच काहीसं आपल्या आतमध्ये दोन प्रवृतींचं सदैव युध्द सुरू असतं,
यामध्ये जिंकतं कोण? बरेचदा ज्या प्रवृत्तीला आपण प्रोत्साहन देतो ज्याच्या आम्ही आहारी
जातो आणि गुलाम होतो.
आणखी एक वेगळा मुद्दा आपल्यासोबत शेअर करावासा
वाटतो तो म्हणजे कोणत्याही नागरी संस्कृतीचा विनाशाचे तीन कट - एका पौर्वात्य
विचारवंताच्या चिंतनातून आलेलं हे एक कटूसत्य-
1.
कुटूंबव्यवस्था
उध्वस्त करणे : कुटूंबातील आईचं स्थान उळमळीत करणे. तीला घर सांभाळणारी स्त्री
म्हणून घेण्याची लाज वाटू लागेल तेव्हा ती आपल्या पाल्यांवर आणि संपूर्ण घरावर संस्कार करण्यास अपयशी होईल. 'स्वामि तिन्ही जगाचा आईविना भिकारी' हे उचीग नाही
म्हटलेलं. पण मग याच आईमुळे तीच्या पाल्यांवर, घरावर योग्य संस्कार करण्याची, त्यांना
घडविण्याची शक्ती असते. कोणत्याही पाल्याला बाळकडू हे तीच देते. त्याच मातेला
चिथावणी देऊन नको ते डोक्यामध्ये घालून तीचं मुळात घरपण आणि घर सांभाळणारी स्त्री
अशी जाणीव करून दिली; तीच्या आत अन्यायाची ठिणगी पेटावी आणि एकदा ठिणगी पेटली की
आपणा सर्वांना माहित्येय त्या ठिणगीचं वणव्यात कसं रूपांतर होते आणि त्याचे काय
परिणाम होतात ते.
2.
शिक्षणप्रणाली
भ्रष्ट करणे : गुरू, गुरूजी या शब्दाचा खरा अर्थ- 'गु 'म्हणजे अंधार आणि 'रू' म्हणजे
दूर करणारा. मुलांवर आईनंतर संस्कार करणारा दुसरा गुरू म्हणजे शिक्षक! पण याच नागरी संस्कृतीच्या विनाशासाठी शिक्षकांचं समाजातील स्थान महत्व कमी करणे. विद्यार्थ्यांच्या मनातील
त्यांची प्रतिमा, आदर संपुष्टात येईपर्यंत तुच्छ लेखणे हे एक नागरी संस्कृतीचा विनाशाचे कारण होय.
3.
जे
आदर्श/दीपस्तंभ आहेत त्यांची मानहानी करणे : बुद्धिवंतांच्या- आपल्या आदर्श
व्यक्तींच्या कार्यामुळे पुढील पिढीस प्रेरणा मिळते, बळ मिळते. समाजासाठी हिताचं
कार्य करण्याची इर्शा निर्माण होते. पण समाज बिघडविण्यासाठी नागरी संस्कृतीचा नाश
करण्यासाठी याच बुध्दिवंतांचा अपमान करणे, त्यांच्यावर शिंतोडे उडविणे, विटंबना करणे, त्यांच्या
विचारांवर एवढा संशय निर्माण करणे की, कोणी त्यांचं गंभीरपणे ऐकणार नाही. कोणी
त्यांच्या विचारधारेचा अवलंब करणार नाही किंवा कोणी त्यांनी दाखविलेल्या मार्गावर
चालणार नाही. एकदा का विवेकी आई गायब झाली, विद्येसाठी
आयुष्य वेचणारा धेयवादी गुरू खचून गेला आणि सर्वस्व त्यागणारा, समर्पित वृत्तीच्या
बुध्दिवंताचा ऱ्हास झाला की नव्या पिढीला मुल्याचं शिक्षण कोण देणार?
बुध्दाच्या वाटेवर चालणाऱ्या या
बोधिसत्व डॉ. बाबासाहेबांचे कर्तुत्व आणि उपकार संपूर्ण भारतवासियांवर आहेत.
भारताच्या बहुजनांसाठी त्यांच्या हितासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूध्द
आपला देह झिजवला. बंधुनो, बाबासाहेबांनी आपल्यासाठी आपल्यावर होणाऱ्या
अत्याचाराविरूध्द लढण्यासाठी ते स्वत:च्या कुटूंबापासून अनेकदा दूर राहिले.
मनामनात अन्यायाविरूध्द लढण्याची इर्शा निर्माण केली. खचलेल्या पिचलेल्यांचे मनोबल वाढविले.
इतकेच नव्हे तर इतरांचा रोष आढवून घेतला, टीकांना सामोरे जावे लागले.
राष्ट्रद्रोहाचा त्यांच्यावर आरोपही झाला. पण या सगळयाला बाबासाहेबांनी अत्यंत प्रभावीपणे
कृतीतून उत्तरे दिली आणि भल्याभल्या प्रकांड पंडितांची तोंडे बंद केली . पण मला एका
अदृश्य मुद्दयावर भाष्य करावसं वाटतं ते म्हणजे, आपल्या समाजासाठी विषमेतेविरूध्द लढत
असताना त्यांनी आपला पिता गमावला. वडीलांच्या आरोग्याकडे बाबासाहेबांना नीट लक्ष
नाही देता आलं. याच विषमतेविरूध्द लढताना बाबासाहेबांनी आपली पत्नी रमा हिला
गमाविले. याचसाठी बाबासाहेबांनी राजरत्न आणि त्यांच्या इतर मुलांना गमाविले.
याचसाठी त्यांनी मोठे बंधू यांना गमाविले. ही जी मोठी लोकं असतात ना त्यांना स्वत:च्या घरच्यांचा विचार करायला त्यांची देखभाल करायला वेळच नसतो. त्यांना
त्याही पेक्षा महत्वाचे काम हे समाजचे वाटते आणि त्यात ते स्वत:ला झोकून देतात.
किंबहुना स्वत:साठी लक्ष द्यायला त्यांना सवडच नसते. मला असं वाटतं की, ही महान
माणसं जन्मच मुळी दुसऱ्यांचं हित जपण्यासाठीच घेतात. तथागत गौतम बुध्द, संत कबीर,
महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे आपणा सर्वांवर अमाप
उपकार आहेत म्हणून बंधूंनो या महामानवांचे आपण कायम ऋणीच असलं पाहिजे.
(सदरील लेख हा माझे सन २०१७ चे भाषण आहे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा