चाफेरी बौध्दमहासभेने परजिल्ह्यातील
नवदाम्पत्यास
बौध्दधम्माची दीक्षा देवून जपलीय विवाहाची
परंपरा
मंगलपरिणय..! नवदाम्पत्य... मंगलाष्टकांचा गजर... पूजाअर्चा... यजमान्यांची धावपळ... करवल्यांचं नटणंथटणं... बॉम्बेछाप
हळदीसमारंभ… आणि त्यानंतर हनिमूनला जाण्याची तयारी... या गोष्टी म्हणजे लहानग्यांपासून
सर्वांसाठी नवचैतन्याच्या... हर्षाच्या... लगीनसराईच्या...
पण इथे झालेली लगीनसराईची धावपळ काहीशी वेगळी आणि आदर्श अशी म्हणावी लागेल... चाफेरी गावातील बौध्दमहासभेच्या गावशाखेने परजिल्ह्यातील नवदाम्पत्यास आणि त्यांच्या कुटूंबियांस अशा कठीण परिस्थितीत आपला मदतीचा हात देवून त्यांना या प्रसंगातून केवळ सहिसलामत बाहेरच काढले नव्हे तर त्यातून एक समाजाप्रति अभिमानाचा असा
आदर्श घालून दिलाय...
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवापूर
येथील तुकाराम कदम यांचा पुत्र गणेश वरमुलगा आणि त्याचे कुटूंबिय हिंदू समाजातील... तसेच सावंतवाडी
येथील अशोक कदम यांची कन्या तेजस्वी ही नववधू बौध्द धर्मिय... सावंतवाडीसारख्या शहरात दोन्ही परिवार ‘वेल सेटल्ड’… नववधूच्या वडीलांची या लग्नाला
संमत्ती नव्हती... हा वरमुलगा जरी आयपीएस अधिकारी झाला तरी माझी मुलगी कदापि देणार नाही, अशी तीच्या वडीलांची जणू भीष्मप्रतिज्ञा... त्यात विवाह बौध्द पध्दतीने व्हावा, अशी नववधूचीही अट...
अशा पेचप्रसंगी वरमुलगा आणि त्याच्या आईवडीलांनी धाव घेतली ती रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद-खंडाळा येथील आयु.
दशरथ जाधव या वरमुलाच्या मामांकडे... धार्मिक बाब आल्याने मामांनी त्यांना एक आशेचा किरण दाखविला... त्यांनी
चाफेरी येथील बौध्दमहासभा शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली. वरमुलगा आणि त्याचे कुटूंबियांना आपल्या शाखेचे सभासदत्व बहाल करून आणि बौध्दधम्माची दीक्षा देवून मंगलपरिणय पार पाडण्याचे आश्वासन दिल्याने या कुटूंबियांचा जीव भांड्यात पडला...
त्यानंतर काही दिवसांनी हॉलवर उपासकांनी
वरमुलास प्रथम बौध्दधम्माची दीक्षा दिली. यामध्ये तथागत भगवान गौतम बुध्दांच्या पंचांगप्रणाम, त्रिसरण पंचशीलांचे, अष्टांगिकमार्गाचे पठण केले. धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे त्या नवदाम्पत्याने शपथ ग्रहण करून बौध्दधम्माच्या मंगलाष्टकांच्या निनादात एकमेकांच्या गळयामध्ये वरमाळा अर्पण करून सर्व उपस्थितांना अभिवादन
केले. आयु. दशरथ जाधव व दमयंती जाधव या उभयतांनी नववधूच्या आईवडीलांच्या
अनुपस्थितीत कन्यादान व इतर सर्व सोपस्कर पार पाडून नववधूच्या आईवडीलांची उणीव
भरून काढल्याने या विवाहाला एक प्रकारचे नाविन्य प्राप्त झाले.
सिंधुदूर्ग सारख्या
परजिल्ह्यातील या नवदाम्पत्याचा मंगलपरिणय सोहळा अशा
पध्दतीने पार पाडल्याने पंचक्रोशीतून चाफेरी गावशाखेचे अभिनंदन करण्यात येत आहे. या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने वरमुलाच्या कुटूंबियांनी समाधानाने त्यांच्या संपूर्ण परिवारालाही भविष्यात बौध्दधम्माची दीक्षा देण्याचे आश्वासन शाखेच्या अध्यक्षांकडे दिल्याने परिसरामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बौध्दधम्माची दीक्षा देवून विवाह पार पाडून एखाद्याचे हित साधण्याची परंपरा चाफेरी या गावशाखेने आजही जपलीय... यापूर्वीही या शाखेने आपल्याच एका सभासदाच्या मुलाचा विवाह अशाच
पध्दतीने पार पाडून देवून त्या ही नवदाम्पत्याचं हित साधून
समाजाप्रति एक आदर्श घालून दिलाय... हा विवाह सोहळा
आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच शक्य झाला. तसेच जाता जाता जर का एखाद्याचे हित
होणार असेल तर ते प्रत्येकाने आवश्य करावे, त्यामध्ये आपला हात मागे येता काम नये;
मग ते कार्य कोणतेही असो; त्यातच खरा आनंद असल्याचे असे मत शाखेचे अध्यक्ष आयु.
चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केले.
मंगलपरिणयाचा हा सोहळा धार्मिक पध्दतीने
बौध्दमहासभा गावशाखा चाफेरी या शाखेचे सर्व पदाधिकारी, सभासद, महिला, आप्तेष्ट व
लहानथोर आदींनी मंगलमय वातावरणात पार पाडला. सदर विवाह सोहळ्याला परिसरातील बहुसंख्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा