बुधवार, ४ जुलै, २०१८

असा असावा ॲटिटयुड : एक चिंतन


    पायात चप्पल किंवा बुट असल्याशिवाय काेणी घरातून बाहेरच पडत नाही. सध्याचे भक्तही अनवाणी पायांनी देवळात जाईनासे झालेत. या धक्काधक्कीच्या जीवनात जितकं आपण  या चप्पल किंवा बुटांशी एकरूप झालो आहोत तितका आपला स्वत:चा ॲटिट्युडही मिळताजुळता झाला तर… चला तर या चप्पलकडून आता आपण काहीतरी बोध घेऊया…



चप्पल आपल्या बलाढय शरीराला झेपवू शकते त्याप्रमाणे आयुष्यात कितीही भली मोठी संकटे आली तरी आपण ती पेलली पाहिजेत.


चप्पल नेहमी एक दुसरीच्या सोबतच ठेवाव्या लागतात. एक चप्पल काही कामाची नसते. त्याप्रमाणे आयुष्यात नेहमी रिलेशन / फॅमिली / सोसायटीमध्ये एकमेकांच्या सोबत गुण्यागोविंदाने राहणे योग्य असते.



नवीन चप्पल असताना पायांना लागतात पण नंतर वापरून वापरून सवय होऊन जाते. त्याप्रमाणे कोणतीही नवीन अवघड गोष्ट सुरूवातील कठीण वाटते. पण तिला धैर्याने सामोरं गेलं तर तीच गोष्ट सुलभ होते आणि आपण यशस्वी होतो.



चप्पल ही केवळ आपल्या पायांसाठीच असते त्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीला नेहमी तीच्याच जागेवर ठेवणे. आपल्या डोक्यावर घेऊ नये. (स्वत:च्या अहंकाराला डोक्यावर चढवू नये)


 
जसं बुटांना आपण अधूनमधून पॉलिश करतो त्याचप्रमाणे आपल्या मनातील कुविचारांना काढून टाकून चांगले विचार भरून स्वत:ला अपडेट करावे.


 

कधीकधी बुटांच्या लेस धावताना टाईट किंवा सैल करतो त्याचप्रमाणे आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत आपल्या विचारांच्या लेसेस घट्ट किंवा सैल करून कधी कठोर तर कधी उदार होऊन जगावं.


 
बुटांचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचा सोल. हा "Sole" सर्वात मजबूत असतोत्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील "Soul" ला त्याच्या अंतरंगात डोकावून या "Soul" चे सुक्ष्म निरिक्षण करून त्याला सक्षम बनवा. मग बघा काय जादू होते ती. येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला निर्भयपणे सामारं जायची शक्ती येते. 


   चला तर मग आपणही या अनमोल अशा Soul च्या सहाय्याने अहंकार, अभिमान, इगो, गर्व, स्वार्थ, ॲटिट्युड सर्वकाही बाजुला सारून नि:स्वार्थी जीवनशैलीचा अवलंब करूया.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...