तू लाख हिफाजत कर ले
तू लाख करे रखवाली
उड़ जाएगा एक दिन पंछी
रहेगा पिंजरा खाली...
तू कसा विसरशील ही अजरामर कव्वाली... ती तर तुझ्या नेहमीच मुखात असे. किती सहज गायचास... पण आम्हाला मात्र इतक्या सहज आणि अवेळी हा तुझा संसार रुपी पिंजरा रिकामा टाकून पक्षासारखा भुर्रकन निघुन जाशील याची जराही कल्पना नाही आली रे. तू अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे साऱ्यांना जीव लावणाऱ्या जिवलग्याचा जीव इतक्या सहज आणि लवकर जावा ही वेदनाच आम्हाला असह्य आहे. जणू पांडुरंगाच्या मनोऱ्याचा पाचवा खांब निखळून पडलाय... स्नेहभावाने, बंधुत्वाच्या नात्याने गुंफून ठेवलंस तू प्रत्येकाला आणि हीच जोडलेली माणसं तुझ्या जाण्याने हळहळतायत... चटका लावलास तू साऱ्यांच्या काळजाला...
तुझं चंद्रमणी हे नाव फार थोड्याच लोकांना माहीत असावं. सारा गाव आणि या पंचक्रोशीचा तू 'बंधू' म्हणजे भाऊ म्हणजे सखा सोबती.
आयुष्यभर तू कधी पैशाच्यापाठी धावला नाहीस. तू धावलास... तू धडपडलास... तू भोवलास... तो केवळ ऋणानुबंधाचा, स्नेहाचा, बंधुत्वाच्या नात्याचा सडा शिंपडीत... जितकं आहे त्यात समाधानी असण्याच्या गुणामुळे तू कसल्याही लोभाला कधीही जवळ केले नाहीस. खराखुरा जगलास तुझ्या 'बंधू' या नावाला. हीच तुझी खरी कमाई आहे.
भावांमध्ये तू पाचवा आणि शेवटच्या क्रमांकाचा त्यामुळे आधीच सर्वांचा लाडका. माझ्या आईबापाचा तर जणू मुलगा होतास तू! आमच्यासोबत लहान होऊन बागडलास... खेळलास... तू आमच्यात इतका समरस झालाच की पुढे आम्हाला तू चुलता कमी भावासारखा-मित्रासारखा जिव्हाळा दिलास. आमचा दादा म्हणजे राजेंद्र आणि तू तर सख्खे मित्रच असे माझे आई-वडील अनेकदा कौतुकाने म्हणत. मी अर्धवट ठेवलेले जेवणाचे ताट अर्धवट राहिलेला खाऊ मोठ्या मायेने तू ग्रहण केलास. मी स्वतःला खूप धन्य समजतो कारण मला तुझा खूप सहवास मिळाला. तुझ्याकडून शिकण्यासारख्या तशा अनेक गोष्टी होत्या. तथागतांचा आणि बाबासाहेबांचा अभिमान तुझ्या रक्तात भिनलेला. त्यांच्या घडलेल्या प्रसंगांचे तपशीलवारपणे कथाकथन करण्याची तुझी हातोटी, ऐकणाऱ्यांची उत्कंठा आणि संपूर्ण लक्ष वेधून घेण्याची कला तुझी वाखाणण्याजोगी होती. तुझे बोल कानात प्राण आणून ऐकतच राहावं असं वाटायचं... बरं एखादी नवीन गोष्ट आमच्या सारख्या लहानांकडूनही जाणून घेण्याची तुझी जिज्ञासू वृत्ती ही तितकीच विलोभनीय.
मुंबईसारख्या मेट्रोसिटीतील लायसन असणारा तूच पहिला ड्रायव्हर असावास आपल्या परिसरात. मी तुझ्याकडूनच ड्रायव्हिंगचे पहिले धडे घेतले. तूच शिकवलीस मला त्या घाणेसड्यावर सायकलवरच्या कसरती... तू पुढे आणि मी दोन्ही हात मोकळे सोडून मागे क्यारियरवर उभा... तर कधी तू मागे असायचास... कसरतींचा सराव करताना कितींदा तुझ्या-माझ्या ढोपरांनी-कोपरानी तिथला रेवा खाल्लाय हे आठवतंय ना तुला..?
तारुण्यातल्या तुझ्या कपड्यांचा पेहराव, तुझ्या त्या घनदाट केसांची स्टाइल व बोलण्याची लकब विलोभनीय असायची...
माझ्या आयुष्याला एक वेगळा सर्वात महत्त्वाचा आयाम घालून दिलास आणि त्या आयामातून पुढे मी ज्या कलेशी समरस झालो ती कला म्हणजे तुझं गाणं... अगदी सहज बोलता बोलता तुझ्या अंतरंगातील उचंबळून आलेल्या भावना शब्दबद्ध करून गीतं रचणारा तू इतका महान कवी-गीतकार आणि सुमधुर आवाजाचा गायक तू माझ्यासोबत होतास... तासंतास तू आणि मी गाणी गात राहायचो. हाताला लागेल ते घेऊन तुझ्या गाण्याला ठेका धरायचं भाग्य मला लाभलं. प्रत्येक गीतातल्या भावनाप्रधान शब्दांचा वर्षाव, आवाजातील सुरांचा लहेजा आणि ताल व लय या साऱ्यांची गुंफण माझ्या अंतरंगात त्या बालवयातच विणली गेलीय. माझ्यात संगीताची बीजं रोवणारा तू माझा पहिलावहिला गुरु आहेस बंधू! तुझा आवाज, तुझी गीतातील शब्दफेक आणि ती नजाकत हुबेहूब महाराष्ट्र लोकसंगीताचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांचीच भासत असे. त्यामुळे तुझं गाणं डोळे मिटून ऐकलं तर समोर आनंद शिंदेच गात असल्याचा भास व्हायचा. आनंद शिंदेंचा तू खूप मोठा फ्यान होतास. त्यांनी गायलेली सर्व गीतं तुझी तोंडपाठ होती आणि ती तू शिंदेशाहीच्या ठसक्यात गाताना रसिकांना भुरळ घातलीस आणि आपले एक विश्व निर्माण केलेस. तू ह्या पंचक्रोशीचा आनंद शिंदे आहेस!
बंदू तुला नाही माहित तू माझ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कलेबद्दलचे किती पैलू सजविलेस. प्रत्येक गीताला एक इतिहास असतो. आणि हाच इतिहास जाणून घेण्याची जी मला सवय झाली ती आजही तितकीच तीव्र आहे.
एकदा मी पाचवीसहावीत असताना माझ्यातली ही कला ओळखून गवळीवाड्याच्या एका जंगी सामन्यात तुझा प्रतिस्पर्धी म्हणून तू मला 'काय राव तुम्ही धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं' हे कोपरखळी असणारं गीत गाण्याची संधी दिलीस... मी ही ते खूप जोमाने गायलो. त्यानंतर तू माझ्या गाण्याला उत्तर देताना 'काय ह्या पोराच खेळं बाहुलीशी लोळं' हे गीत गाऊन तू उपस्थित रसिकांचे खुप मनोरंजन केलेस. आज त्या क्षणाची आठवण झाली की मला माझ्यासह तुझेही हसू आल्यावाचून राहत नाही. तू खऱ्या अर्थाने गाणं जगलास. चोवीस तास गाणं तुझ्या मनात गुंज घालीत असायचं. वडिलांच्या चिरेखाणीवर गाडी चालवतानाही तुझं गुणगुणनं कामगारांपासून सर्व लोकांना मोहीत करायचं. या कलेबद्दलची तुझी महत्त्वाकांक्षा ही तेवढीच प्रबळ आणि तिच्या जोरावर तू आनंद शिंदे यांच्या मैफिलीत जाऊन बसलास. आनंद शिंदे रोज तुला घ्यायला व सोडायला स्वतः जातीने यायचे हे आम्हाला जेव्हा आमची सुजाता आक्का सांगायची ना तेव्हा आजोबांपासून आम्हा सर्व बालगोपाळांची छाती अभिमानाने फुगायची. आनंद शिंदेंसोबतची तुझी काढलेली छायाचित्रे खूप बोलकी वाटतात. कवालीच्या दौऱ्यांमुळे त्यांच्यासोबत तू महाराष्ट्रभर फिरलास. मुंबईतील मोठ-मोठे रेकॉर्डिंग स्टुडिओ पाहायचं भाग्य तुला लाभलं. आनंद शिंदेंचा सहगायक म्हणून जागा मिळवून तू पवार परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलास. जणू त्यांच्या गळ्यातला ताईत झालेला तू मात्र गावच्या ओढीने फार काळ रमला नाहीस तिकडे आणि मुंबईतून परतलेला तू गावात आणि इतरत्र जिथे संधी मिळेल तिथे आपल्या कलेचा आविष्कार दाखवून देत होतास. भगवान बुद्ध डॉ. बाबासाहेबांच्या जयंती असो, लग्न बारसे हळदी समारंभ असो; तू तिथल्यातिथे गीत रचून सादर करण्याची हातोटी तुझी विलक्षण होती. सलाम आहे बंधू तुला!
यापूर्वी तीन वेळा मरणाच्या दारातून परत आलेला तू अवलिया आहेस. तुझ्या अल्सरच्या ऑपरेशनला आणखी दहा मिनिटे उशीर झाला असता तर तुझं काही खरं नव्हतं असं माझ्या वडिलांकडे डॉक्टरांनी कबूल करून ऑपरेशन यशस्वी केलं. त्यानंतर तुझा पावस ठिकाणी भल्या मोठ्या उतारात झालेला वाहनाचा अपघात आणि त्या अपघातातून बालंबाल वाचलेला तू आणि त्यानंतर रत्नागिरीतल्या एका विहिरीत रात्रीच्या गडद अंधारात खोल पाण्यात पडूनही तू पंपाच्या पाईपच्या सहाय्याने पकडत पकडत विहिरीच्या काठापर्यंत आलास खरा; पण तुझा हा वनवास इथेच संपला नव्हता. एका हाताच्या अंतरावर विहिरीचा काठ आलेला असताना तुझा हात सुटून परत खाली कोसळलास... तरीही जिवाची बाजी लावून मरणाला परत पाठवणारा सिकंदर बादशहा तू जगलास तो तुझ्यातल्या प्रचंड स्ट्रॉंग असलेल्या विलपॉवरमुळेच. या विलपॉवरच्या बळावरच तू आज पर्यंत मृत्यूला अनेकदा हुलकावण्या दिल्यास आणि स्वच्छंदीपणे जगण्याचा आनंद तू उपभोगलास. पण याच स्वच्छंदी जगण्याच्या अंगवळणी पडलेल्या सवयीमुळे तू व्यसनाच्या आहारी गेलास. बस, फक्त हीच गोष्ट आम्हाला तुझी रुचत नव्हती. कित्येकांनी तुला काळजीपोटी ती सोडण्याची विनवणी केली पण ती तू कधीच गांभीर्याने घेतली नाहीस आणि जेव्हा खरंच वेळ निघून गेली त्यावेळी तुला याचा पश्चाताप झाला होता. रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलात तू ही गोष्ट कबूल करताना तुझे डोळे डबडबून आले होते. पण आता खरं तर कोणाच्याच काही हातात राहिलं नव्हतं. आम्ही सर्वजण तुझी अवस्था पाहून तीळतीळ तुटत होतो कारण तुझी प्रकृती दिवसेंदिवस हाताबाहेर जात होती.
निरभ्र आकाशाप्रमाणे स्वच्छ स्वभाव या तुझ्या स्वभावाचा काहींनी गैरफायदा घेतल्याची खंत तुझ्या मनात सल करून होती.
अरे तू कॉटवर असतानाही तुझ्यातला विनोदी कलाकार स्वस्थ बसत नव्हता. कॉमेडीचा ह्युमर तुझ्या नसानसात होता. त्यामुळे तू जीवनाच्या अखेरपर्यंत दुसऱ्यांना हसवलंस. स्वतः हसता-हसता तुझा आजारही तू हसण्यावरच घेतलास आणि हसत-हसत असाच अखेर तू आम्हा सर्वांना रडवून गेलास. तुझा अंत तुला दिसून आला त्यावेळी ज्यांनी तुला आपल्या मुलाप्रमाणं जोपासलं तो तुझा दादा माझे वडील यांना तू एकांतवासात तुझ्या मनातील अधुऱ्या राहिलेल्या गोष्टी, दुःख आणि शेवटच्या इच्छा बोलून दाखविल्यास आणि या तुझ्या इच्छा वडीलकीच्या नात्याने माझ्या बापाने ऐकून घेऊन तुझ्या पाठीशी खंबीर राहिल्यामुळे तू आज निर्धास्तपणे शांत मनाने या जगाचा निरोप घेतलास. जसं लहान मूल आपल्या आई-वडिलांकडे आपली व्यथा मांडतं ना तसंच तू तुझ्या दादाकडे व्यक्त होऊन तू मोकळ्या मनाने मृत्यूला सामोरा गेलास. तूच म्हणायचास ना... तुझ्या या दादाची करुणेची किमया... आणि या किमयेमुळेच अनेक लोक आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात तुझ्या दादासारख्या सच्चा माणसाच्या सानिध्यात येतात म्हणुन... आणि तू... तू तर त्याचा सख्खा रक्ताचा हाडामांसाचा भाऊ... तो तुलाही कसा टाकेल... आणि ते ही तुझ्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात..? भाऊ नव्हे तर बापासारखी माया दिली तुला त्यांनी आणि तुही अखेरपर्यंत तुझ्या दादाला सारखी सारखी साद घालीत होतास.
मी नोकरीनिमित्त मुंबईत असताना तू एकदा गाडी घेऊन तिकडे आल्याचा लैंडलाइन वर फोन आला. मी लागलीच परळच्या हायवेला त्या सोनबा येलवेसारखी तुझी ३/४ तास वाट पाहत उभा होतो. त्यावेळी मोबाईल नव्हते. MH08 नंबर प्लेट असलेले ट्रक डोळे फाडून पहात होतो. मात्र तुझी माझी गाठ काही झालीच नाही. दुसऱ्या वेळी मात्र तुझ्या भेटीसाठी मी परळहुन पनवेल गाठले. तुझ्या भेटीसाठी आतुर झालेलं माझं मन सद्गदून आलं होतं. तेव्हा तू मारलेली मला मिठी आज मात्र मला पोरकी करून गेली.
त्यानंतर तू मला स्वतःच्या पासपोर्ट साईज फोटोसह एक चिठ्ठी लिहिलीस. त्या चिठ्ठीत तुझ्या कलेचं स्वप्न मुंबई सोडल्यामुळे अर्धवट राहिल्याचं सल तू मांडलेस. त्यात पुढे मला तुझा आवडता गायक आनंद शिंदे यास भेटून तुझा रेफरन्स देऊन माझा आवाज त्यास ऐकावयास सांगितलेस. बंदू खरं सांगतो, मी ही दोन वेळा त्यांना गोरेगावला भेटण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने आनंद शिंदे यांची भेट काही होऊ शकली नाही. त्याबद्दल माफ कर मला.
तुझे हे कलागुण उतरलेत तुझा मुलगा अभिजितमध्ये. तो ही गीतरचना करतो अधून-मधून. तुझी छबी मला दिसते त्याच्यात... तुझा वसा असाच पुढे चालत राहो... तुझे नाव अखंड चालत राहो... अखंड चालत राहो... तुझ्या जाण्याने खचून गेलेल्या पत्नीसह तुझ्या मुलांना पुन्हा उभे राहण्याचे बळ येवो. तुझ्या पेक्षाही उंच उंच भरारी घेऊ दे त्यांना. त्यांच्या यशाने तू नक्कीच सुखावशील.
केवळ पाच दशकं लोकांच्या मनात बंधुभाव निर्माण करून अर्ध्यावरच आपला डाव संपून आम्हाला चकवा देऊन तू अनंतात विलीन झालास. फसवलस तू आम्हाला... सोडलीस तू आमची साथ अर्ध्यावरच... तरीच कोरोनाच्या लोकडाऊनमध्ये मी मुंबईत अडकलोय हे समजल्यावर तू मला फोन करून आणायला सांगितलेला आलेपाक हा तुझा केवळ बहाणा होता. तुला माझ्याशी बोलायचं होतं हे मला आता उमजून येतंय... तरीच आमच्या दोघांच्या मनात पाल चुकचुकली अन क्षणभर सर्वांमध्ये नीरव शांतता पसरली... तू बोललास पोटभर आमच्या लहानग्या कौशलकडे... तू मायेने हात फिरवलास आमच्या लहानग्या मोक्षदच्या चेहऱ्यावरून... काय तुला हेच साध्य करायचं होतं का..? तू फसवलंस आम्हाला... सोडलीस तु आमची साथ अर्ध्यावरच...
या माझ्या पहिल्यावहिल्या गुरुला-बंदूला गुरुदक्षिणा म्हणून माझी ही शब्दसुमनांजली...
बंदू खूप काही गोष्टी राहून गेल्या नाही मांडता येत त्या उपऱ्या शब्दातुन...
तुझ्या स्मृतींचा खजिना उलगडता उलगडता
अश्रूंचा पूर ही कोरडा होतो
आणि समोर उभा राहतो
निरागस सोज्वळ मायाळू दयाळू
सर्वांचा बंधू तू.
फक्त तूच बंदू... फक्त तूच बंदू...
तुला निर्वाण प्राप्त होवो..!
- तुझा जितू

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा