माझा पहिला वहिला लेख तो ही
माझ्या विसाव्या वाढदिवशी दै. रत्नागिरी टाइम्समध्ये प्रसिध्द व्हावा अशा दुग्धशर्करा योगामुळे
मला अप्रुप वाटल्यावाचून राहत नाही. पण आज या गोष्टीला जवळजवळ अठरा
वर्षे होऊन गेल्यावरही अचानक अशी जूनी कात्रणं हाती लागली की मनामध्ये विलक्षण चेतना,
त्यावेळच्या आठवणी, त्यावेळचा तो हरहुन्नरी स्वभाव याचंही नवल वाटल्यावाचून राहत नाही.
असो.
… पण दुर्दैवाने आजही हे स्त्रीयांवरील अत्याचार कमी झाले नाहीत किंबहुना ते पाशवी प्रवृत्तीने दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. चिमुकल्या कळयांना हे नराधम सोडत नाहीत आणि आपणही त्या प्रसंगाची दोन दिवस चर्चा करून विसरून जातो. यावरून समाजाची मानसिकता बोथट होत चाललीय की काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे आणि त्या नराधमांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे स्वैराचाराला अप्रत्यक्षपणे खतपाणीच मिळते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कधी करणार आदर आपण स्त्रीयांचा? कधी फिरणार बिनधास्तपणे समाजात आपल्या या भगिनी? रक्षाबंधनाला राखी बांधणारे पुरूष हे रक्षक आणि राखी न बांधणारे पुरूष हे भक्षक असा प्रघातच निर्माण होतोय की काय अशी शंका उपस्थित होते. स्त्रीचं रक्षण करायला तीने ज्याला राखी बांधलीय त्या भावानेच करायचं का? आणि बाकीच्यांनी तीचे लचके तोडायचे का? आणि ज्यांना भाऊ नाही त्यांचं काय? हे आणि असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीतच राहतात यापेक्षा कोणतीही शोकांतिका नाही...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा