काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||१|| नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||२|| - तुकाराम, समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी ३१ जानेवारी १९२० रोजी 'मुकनायक' हे पाक्षिक काढले. सन १९२३ मध्ये परदेशात पुढील शिक्षणासाठी गेले व 'मूकनायक' बंद पडले. ह्याच नावाने पत्र सुरु करावं हे बरेच दिवस मनात होतं. डॉ. आंबेडकरांना समर्पित करून ते या ब्लॉगद्वारे सुरु केल्याचं समाधान नक्कीच आहे.
मंगळवार, १२ जून, २०१८
शुक्रवार, १ जून, २०१८
निष्पाप भगिनींना द्या
माझा पहिला वहिला लेख तो ही
माझ्या विसाव्या वाढदिवशी दै. रत्नागिरी टाइम्समध्ये प्रसिध्द व्हावा अशा दुग्धशर्करा योगामुळे
मला अप्रुप वाटल्यावाचून राहत नाही. पण आज या गोष्टीला जवळजवळ अठरा
वर्षे होऊन गेल्यावरही अचानक अशी जूनी कात्रणं हाती लागली की मनामध्ये विलक्षण चेतना,
त्यावेळच्या आठवणी, त्यावेळचा तो हरहुन्नरी स्वभाव याचंही नवल वाटल्यावाचून राहत नाही.
असो.
… पण दुर्दैवाने आजही हे स्त्रीयांवरील अत्याचार कमी झाले नाहीत किंबहुना ते पाशवी प्रवृत्तीने दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. चिमुकल्या कळयांना हे नराधम सोडत नाहीत आणि आपणही त्या प्रसंगाची दोन दिवस चर्चा करून विसरून जातो. यावरून समाजाची मानसिकता बोथट होत चाललीय की काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे आणि त्या नराधमांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे स्वैराचाराला अप्रत्यक्षपणे खतपाणीच मिळते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कधी करणार आदर आपण स्त्रीयांचा? कधी फिरणार बिनधास्तपणे समाजात आपल्या या भगिनी? रक्षाबंधनाला राखी बांधणारे पुरूष हे रक्षक आणि राखी न बांधणारे पुरूष हे भक्षक असा प्रघातच निर्माण होतोय की काय अशी शंका उपस्थित होते. स्त्रीचं रक्षण करायला तीने ज्याला राखी बांधलीय त्या भावानेच करायचं का? आणि बाकीच्यांनी तीचे लचके तोडायचे का? आणि ज्यांना भाऊ नाही त्यांचं काय? हे आणि असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीतच राहतात यापेक्षा कोणतीही शोकांतिका नाही...

भुताटकीबाबतचा हा संभ्रम मिटेल काय?
भुताटकीबाबतचा हा संभ्रम मिटेल काय?
२००० नोव्हेंबर ८ रोजी दैनिक 'रत्नागिरी टाइम्स' या वुत्तपत्रात लिहिलेले पहिले वहिले पत्रलेखन.
त्यावर मुलुंड येथून वि. अ. सावंत यांची मताशी
सहमत असलेली प्रतिक्रिया.
तसेच रत्नागिरी येथील निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी श्री. मनोहर शेट्ये यांनी मला दोनदा केलेला पत्रप्रपंच.
माझ्या या लेखाला
दिलेल्या प्रतिसादाचं मला अप्रुप वाटल्यावाचून राहत नाही. कारण मुंलुंड मुंबई येथून
श्री. वि. अ. सावंत यांनी माझ्या लेखाशी सहमती दर्शविली तर दुसरीकडे निवृत्त अप्पर
जिल्हाधिकारी इतक्या मोठ्या माणसाने मला पत्ररूपाने कळवावे, ते ही दोन वेळा. त्यांनी
त्या पत्रांमधून आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेले प्रसंग सांगितले. आणि त्यांनी हे
ही सांगितले की, “ठराविक ठिकाणी, ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेला भूत दिसेलच असे नाही
त्याला तशी वेळ यावी लागते.” ...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान
मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...

-
तथागत भगवान बुध्दांच्या काळात म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी आज सारखी विद्युत दिव्यांची सुविधा उपलब्ध नव्हती ....
-
राजगृहाची अविस्मरणीय सपत्नीक भेट भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'राजगृह' हे मुंबईमधील ...
-
जागतिक कीर्तीचा स्कॉलर विद्यार्थी म्हणून विदेशी युनिव्हर्सिटीच्या प्रथम क्रमांकाच्या यादीत ज्याचं नाव कोरलेलं आहे ते युगप्रव...